रेव्ह पार्टी प्रकरणावर खडसेंचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्लाबोल ; काय म्हणाले..

जुलै 27, 2025 5:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२५ । पुण्यातील खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आलीय. या कारवाईने राजकीय वातावरण तापलं असून सत्तेतील तसेच विरोधी नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया समोर येत आहे. अशातच या प्रकरणात खडसेंचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

rave party

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांना स्वतःला असे वाटले पाहिजे की, आता माझ्या पतीवर इतके गंभीर आरोप झाले आहे. तर मी लगेच राजीनामा दिला पाहिजे. आपल्या पक्षाचे नुकसान व्हायला नको. कारण पक्षाचा फायदा आणि पक्षाचे नुकसानी सर्वात पहिले असते. त्यामुळे त्यांनी सर्वात पहिले त्यांनी राजीनामा द्यावा द्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. तुमचा कोर्टावर विश्वास आहे.

कारण तुम्ही म्हणता की ईडीमध्ये महाराष्ट्र राज्यात किंवा देशात कोणालाच जामीन मिळाला नाही. पण कोर्टाने तुम्हाला जामीन दिला. म्हणजे तुम्हाला न्याय दिला आहे. हे प्रकरण कोर्टात जाईल तेव्हा तुम्हाला न्याय मिळेल. परंतु तोपर्यंत राजीनामा द्यायला हवा, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंना लागवलाय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now