जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२५ । महाराष्ट्रात सध्या हनी ट्रॅप प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं आहे. यातच जामनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्यावर हनी ट्रॅपसह वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली असून हनी ट्रॅपवरून खडसेंनी महाजन यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र महाजनांनी नाथभाऊंवर तेच अस्त्र चालवले.

त्यांच्या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. फेसबुकवर गिरीश महाजन यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात दोन फोटो पोस्ट केले आहेत. गुलाब घेतलेली एक व्यक्ती आणि कारमध्ये नाथाभाऊ अशा या फोटोवर महाजन यांनी गुलाबी अस्त्र ओढले आहेत.

एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे, असा टोला महाजनांनी लगावला आहे. खडसे आणि लोढा यांचा फोटो शेअर करत त्यांनी या पोस्टवरून बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
“एकनाथ खडसे, काय ही तुझी व्यथा?” म्हणत महाजनांनी खडसेंना डिवचले. एकनाथ खडसेंना गुलाब देताना प्रफुल्ल लोढांचा फोटो व्हायरल झाला. मंत्री गिरीश महाजनांकडून फोटो पोस्ट करत खडसेंना प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत? असा खोचक सवाल त्यांनी केला. ये रिश्ता क्या कहलाता हैं?, म्हणत महाजनांचा खडसेंना टोला लगावला. माझ्यावर असंख्य आरोप केले, पण मी निर्दोष असल्याचे वारंवार सिद्ध झाले, असे महाजन म्हणाले.









