अभाविप धरणगाव शाखेत ‘यशवंत गुणगौरव सोहळा’; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

जुलै 19, 2025 2:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धरणगाव शाखा यांच्या वतीने परिषदेचे शिल्पकार प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “यशवंत गुणगौरव सोहळा” उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

sn

कार्यक्रमाची प्रस्तावना धरणगाव शहराध्यक्ष प्रा. योगेश महाजन यांनी केली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री श्री. दिलीप रामू पाटील यांनी प्रेरणादायी विचार व्यक्त केले, अ.भा.वि.प मांडणी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कुमारी श्रावणी अवरगन यांनी केले, तर आभार प्रदर्शन धरणगाव शहर मंत्री सुदर्शन मराठे यांनी केले.

यावेळी जळगाव विभाग संघटन मंत्री अजित केंद्रे, देवगिरी प्रांत सोशल मीडिया प्रमुख अभिजीत महाजन, जळगाव जिल्हा संयोजक तेजस पाटील, शहर सहमंत्री गार्गी भावे, शहर सहमंत्री मानसी कासार, तसेच केदार भाटिया, रोहित राजपूत, शैलेश चव्हाण, भक्ती पुराणिक, प्रणिता जगताप, शारदा पाटील, कुणाल मराठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now