जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२५ । तुम्हीही देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून गृहकर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ०.२५ बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे. यामुळे EMI वरील हप्ता कमी होणार आहे. नवीन सुधारित दर आज १५ जुलैपासून लागू झाले आहेत.

मात्र दुसरीकडे एसबीआयने ग्राहकांना धक्का दिला आहे. एसबीआयने त्यांच्या अल्पकालीन मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात ०.१५% कपात केली आहे. नवीन दर १५ जुलै २०२५ पासून लागू झाले आहेत. ही कपात सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक दोघांनाही लागू आहे. सामान्य नागरिकांसाठी, ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या एफडीवरील व्याजदर पूर्वी ५.०५% होता, आता तो ४.९०% पर्यंत कमी करण्यात आला आहे. तर, १८० दिवस ते २१० दिवसांच्या एफडीवरील पूर्वीचा व्याजदर ५.८०% होता जो आता ५.६५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. याशिवाय, २११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याज ६.०५% वरून ५.९०% पर्यंत कमी करण्यात आले आहे.

कालावधीनुसार एमसीएलआर दर किती कमी झाला आहे ते जाणून घ्या
१ महिन्याचा एमसीएलआर ८.२० टक्क्यांवरून ७.९५ टक्क्यांवर आला आहे.
३ महिन्यांचा MCLR- तो ८.५५% वरून ८.३५% वर आला आहे.
६ महिन्यांचा MCLR- तो ८.९०% वरून ८.७०% वर आला आहे.
१ वर्षाचा MCLR आता ८.८०% वर आला आहे. तो पूर्वी ९% होता.
२ वर्षांचा MCLR ९.०५% वरून ८.९५% वर आला आहे.
३ वर्षांचा MCLR आता ८.९०% वर आला आहे, तो पूर्वी ९.१०% होता.
याचा फायदा कोणाला मिळेल?
जेव्हा जेव्हा व्याजदर कमी होतो तेव्हा फक्त फ्लोटिंग रेट किंवा MCLR वर कर्ज घेतलेल्यांनाच फायदा मिळतो. फ्लोटिंग रेट नेहमीच बदलत राहतो, तो कमी-अधिक असू शकतो. तथापि, जर तुम्ही स्थिर दरावर कर्ज घेतले असेल, तर रेपो रेटमध्ये वाढ किंवा घट झाल्यामुळे तुम्हाला कोणताही परिणाम होणार नाही.












