Chalisagon : एटीएममधून पाच ग्राहकांना दोन लाखांचा घातला गंडा ; गुन्हा दाखल

जुलै 15, 2025 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशात दिवसेंदिवस फडवणुकीच्या घटना वाढतंय. यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे. मात्र तरीही फसवणुकीच्या काही केल्या थांबताना दिसत नाहीय. अशातच युनियन बँकेच्या एटीएममधून पाच ग्राहकांचा एटीएम पिन व डुप्लिकेट चिप टाकून त्याद्वारे सुमारे २ लाख ७हजार १० रुपयांची रक्कम काढून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ATM

संभाजी भाऊराव पाटील रा. तरवाडे पेठ ता. चाळीसगाव हे पैसे काढण्यासाठी रविवारी दुपारी चाळीसगाव येथील युनियन बँकेच्या एमटीएममध्ये आले होता. कॅनडा बँकेच्या एटीएमने पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचे एटीएम कार्ड एटीएम मशिनमध्ये अडकले. यावेळी एटीएमच्या बाजुलाच एक अनोळखी इसम उभा होता. त्याने एटीएम मशीनवर हेल्पलाईन क्र. असलेला कागद चिकटवलेला असुन त्यावर जर संपर्क करण्यास सांगितले.

पाटील यांनी या हेल्पलाईन क्रमांकावर फोन लावला असता पलीकडून एकाने फोन उचलुन मी बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगुन मी आता बाहेर असुन तु आता तुझे पिनकोड टाकुन बघ, तुझे पिन टाकल्यावर तुझे कार्ड बाहेर येईल. नाहीतर मी संध्याकाळी ७ वाजता आलो की, तुमचे एटीएम कार्ड काढुन देतो, असे सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now