Jalgaon : घरात ठेवलेल्या मंदिरातील दागिने लांबविणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

जुलै 14, 2025 9:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यातच घरात ठेवलेल्या मंदिरातील दागिने चोरट्यांनी चोरून नेणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शाकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४, रा. कासमवाडी जळगांव), राहुल शेखर रावळकर (वय-३२, रा. जाखनी नगर कंजरवाडा जळगांव) असं अटक केलेल्या दोघे संशयित चोरट्यांचे नाव असून दोघांनीही चोरीची कबुली दिली आहे.

dd 1

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जळगांव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मुकुंदनगर लाठी शाळेच्या मागच्या बाजूला मानेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील चांदीच्या दागिन्यांसह इतर दागिने मंदिरासमोर राहत असलेल्या अरुण लक्ष्मण शेटे यांच्या घरी ठेवलेले असतात. व सण – उत्सवादिवशी ते दागिने शिवलिंगाला चढविले जातात. अरुण शेटे हे कुंटुबासह पुणे येथे मुलाकडे गेले असता ६२ हजार किमतीचे हे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. शेटे हे घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली.

त्यानंतर त्यांनी एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात धाव घेत यांची फिर्याद दिली. घटनेचे गाभिर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तापसत त्या आधारे दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, प्रदिप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now