मोठी बातमी ! जळगावच्या आरआर शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनात स्पष्ट

जुलै 13, 2025 8:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२५ । जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयामध्ये नववीच्या वर्गात शिकणारा कल्पेश वाल्मीक इंगळे (१५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्याचा शाळेच्या मैदानात पडून मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट होते. मात्र आता शवविच्छेदन अहवालात कल्पेश इंगळेच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. डोक्यावर पडल्याने मेंदूला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

kalpesh 2

चक्कर येऊन तो पडल्याचे सांगितले जात असले तरी मुलांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. याबाबत रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिस ठाण्यात त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका यांनी दिशाभूल केली असून, त्यांच्याविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

कल्पेशला चक्कर येऊन पडल्याने शाळेतील शिक्षकांनी खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली होती; परंतु त्याच्या व्हॅनचालकाने मुलांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती कल्पेशचे वडील वाल्मीक इंगळे यांना दिली होती. त्यावरून त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणी करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता, सीसीटीव्ही फूटेज, विद्यार्थ्यांचे जबाब आणि घटनास्थळाच्या पाहणी केली.मात्र, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मारहाण करणारी मुले कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे डीवायएसपी संदीप गावित यांनी सांगितले.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरोधात IPC कलम 304 (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now