रेशनचे धान्य काळ्याबाजारात विकण्यासाठी नेताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले ; पारोळ्यातील प्रकार

जुलै 7, 2025 1:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्याबाजारात विकण्यासाठी नेताना रेशन दुकानदारास ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. ही घटना पारोळा तालुक्यातील हिवरखेडा तांडा येथील असून या याप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून त्याच्याकडून एक क्विंटल तांदूळ ताब्यात घेतला आहे. हिवरखेडा तांडा या गावात – वसंत पौलाद पवार हे गेल्या ३० – वर्षापासुन रेशन दुकान चालवतात. परंतू त्याच्या बद्दल तक्रारी होत्या. त्यामुळे त्याचा परवाना यापूर्वी दोन वेळा निलंबित झाला होता. परंतु त्याने ते निलंबन रद्द करत दुकान परत मिळवले.

RATION SHOP jpg webp

तो रेशनचा माल नंतर पारोळ्याला काळ्या बाजारात विकतात. अशी ओरड ग्रामस्थांची होती. म्हणुन रविवारी रोजी सकाळी ११.३० वाजता स्वता रेशन दुकानदार वसंत पवार हे एका दुचाकीकर ५० किलो रेशनचे तांदुळ व दुसरी दुचाकी अभिसिंग रुपचंद राठोड याला ५० किलो तांदुळ असे एकुण एक क्विंटल तांदुळ काळ्या बाजारात विकण्यासाठी घेऊन जात असताना भानुदास पवार व गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

यावेळी भाजप कार्यकर्ते शालीकराम पवार यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना कळवले. डॉ. चौधरी यांनी तत्काळ पारोळा तहसीलदार यांना कळवले. तद्नंतर तहसीलदार देवरेंनी पुरवठा निरीक्षक निरगुडे यांनी घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. तांदूळ व गाड्या ताब्यात घेतल्या. परंतु रेशनचे धान्य काळ्या बाजारात नेताना दुकानदार रंगेहाथ सापडला. त्यास ताब्यात घेत गुन्हा दाखल करून त्याचे दुकान लायसन्स तत्काळ रद्द करावे. न केल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now