‘त्या’ आरोपामुळे बदनामी, आता आपण..; सीमा नाफडे यांच्या गंभीर आरोपानंतर रोहिणी खडसे काय म्हणाल्या..

जुलै 4, 2025 6:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे स्विय सहाय्यक राहिलेल्या पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने ३ जुलै रोजी जळगावात आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेत आपल्या पतीसह रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्याला धमक्या देत असल्याचा आरोप केला होता. तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्याही देत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आज रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषद घेत, सीमा नाफडे यांचे आरोप खोडून काढले आहेत,

RK

सीमा नाफडे यांनी कोणतेही पुरावे न देता, कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्याला बदनाम करण्यासाठी आपल्या नावाचा वापर केला आहे. त्यांच्या या आरोपाच्या मुळे आपल्या नावाची समाज्यात आपली बदनामी झाल्याने,आपण त्यांच्या विरोधात बदनामी खटला दाखल करणार असल्याच ,रोहिणी खडसे यांनी म्हटल आहे.

या सगळ्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकण कर या अडचणीत असलेल्या महिलेची मदत करण्या ऐवजी अशा महिलांचा राजकारण करण्यासाठी वापर करीत असल्याने ,त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाच्या साठी लायक दार नसल्याने त्यांच्या राजीनाम्याची आपण मागणी करत आहोत
रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आपण सातत्याने आवाज उठवत असल्याने,कोणतीही परिस्थिती मध्ये आपल्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि आपण अडचणीत येण्यासाठी त्या हर प्रकारे प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे,त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात यावे यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं ही रोहिणी खडसे यांनी म्हटल आहे.

सीमा नाफडे यांनी आरोप केलेल्या त्यांच्या पती पांडुरंग नाफडे यांच्या सोबत गेल्या दोन वर्ष पासून आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगत ,राष्ट्रवादी पक्षाच्या गुणवंत नील या कार्यकर्त्या सोबत रुपाली चाकणकर यांनी गोपनीय भेट घेत आपल्या विरोधात हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचं सांगताना रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर आणि गुणवंत निळ या कार्यकर्त्यांचे भेटीचे छायाचित्र ही माध्यमांना दाखविले आहे. उद्या आपण पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात काही पुरावे देणार असल्याचं ही रोहिणी खडसे यांनी म्हटल आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now