जिल्हा परिषद जळगाव मार्फत भरती; 35000 पगार मिळेल, अर्ज कसा कराल?

जुलै 4, 2025 1:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद जळगाव मार्फत भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे.

jalgaon zp

त्यानुसार “विधी अधिकारी” पदासाठी हे भरती होणार आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2025 आहे.

सदर पदाची नेमणूक ही पूर्णत्ः कंत्राटी स्वरूपाची असेल. सदर विधी अधिकारी शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाहीत. सदर पदाची नेमणूक देणे/नाकारणे याचे सर्वस्वी अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना असतील.सदर नेमणूक करार पध्दतीने प्रथमत ११ महिन्यासांठी करण्यात येईल. तद्नंतर जास्तीत जास्त ३ वेळा नियुक्ती देता येईल.

अर्जदार विधी अधिकारी यांचे इतर शासकीय कार्यालयात विधीतज्ञ म्हणून नेमणूक झालेली नसावी. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्ती वेळी ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे. या पदासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात (SC) दावे अथवा प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा अनुभव व मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्याय प्राधिकरण येथील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

किती पगार मिळेल?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला एकत्रित मानधन दरमहा ३५००० रुपये दिले जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट – https://zpjalgaon.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

आवश्यक कागदपत्रे?
१. विहित नमुन्यातील अर्ज
२. पदवी प्रमाणपत्र
३. कायद्याच्या पदवीबाबतचे प्रमाणपत्र
४. इतर अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
५. सनद
६. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला.
७. मा. उच्च न्यायालयात (HC) वकीली व्यवसायाचे किमान १० वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र.
८. जिल्हा स्तरीय विधी अधिकारी म्हणून ३ वर्षे अनुभव प्रमाणपत्र.
९. प्रशासकीय व सेवाविषयक व विभागीय चौकशी इ. बाबत कायदेविषयक अनुभव.
१०. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असलेबाबतची प्रमाणपत्रे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now