रोहिणी खडसेंसह कर्त्याकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी ; माजी पीएच्या पत्नीचे गंभीर आरोप

जुलै 3, 2025 4:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२५ । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहिणी खडसे यांचा पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने हा आरोप केला आहे.

rohini khadse jpg webp

रोहिणी खडसे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप पांडुरंग नाफडे यांच्या पत्नी सीमा नाफाडे यांनी केला. राजकीय दबावामुळे पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप देखील नाफडे यांच्या पत्नीने केला आहे.

सीमा नाफाडे यांनी अखेर याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे सीमा नाफाडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

सीमा नाफडे यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. रोहिणी खडसे यांच्यावरील धमकीच्या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now