‘डॉक्टर्स डे’ निमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात

जुलै 2, 2025 3:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉक्टर्स डे निमित्त एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटल निमा डॉक्टर असोसिएशन वुमन्स फोरम आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै रोजी जळगाव शहरातील केपी प्राईड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉक्टर अनिरुद्ध कॅन्सर तज्ञ सर्जन यांनी ओरल कॅन्सर यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टरांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. शरयू विसपुते आणि डॉ. माधुरी कासट यांचा सन्मान करण्यात आला.

nima women

एच.सी.जी. मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे सीनियर मॅनेजर राहुल सूर्यवंशी यांनी मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या मॉडेलिटीज बद्दल संपूर्ण माहिती दिली. तसेच कॅन्सरला थांबवण्यासाठी शहरामध्ये विविध ठिकाणी मोफत स्क्रीनिंग कॅम्प आणि कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम आयोजन करण्यात आलं आहे. त्यात सर्वांनी समाविष्ट व्हावे. ज्यांना कॅन्सर संदर्भात अधिक माहिती किंवा मदत हवी असेल त्यांनी 8668766928 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन राहुल सूर्यवंशी यांनी केले.

रेडिओ मन भवन एफएम यांनी कार्यक्रमाला वेगळं स्वरूप प्राप्त करून दिले. शुभांगी बडगुजर, प्रा.संदीप केदार यांनी डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या. त्यासोबत डॉक्टर गणेश पाटील यांनी रेड स्वस्तिक यासंदर्भात माहिती दिली. मनीषा चौधरी, डॉक्टर क्षितिज भालेराव आणि संपूर्ण नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. निमा डॉक्टर असोसिएशन वुमन्स फोरमच्या अध्यक्षा माधुरी कासट यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now