जळगावात डोळ्यांच्या उपचारासाठी आलेल्या दाम्पत्याचे बसमध्ये चढताना 1 लाख रुपये लंपास

जून 29, 2025 10:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. त्यात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या पर्ससह खिशातून ऐवज लंपास केला जात असल्याच्या घटना वाढल्या आहे. अशीच एक घटना आता समोर आलीय. ज्यात धुळ्याहून जळगावात डोळ्यांच्या उपचारासाठी आलेल्या दाम्पत्याचे बसमध्ये चढताना १ लाख ७ हजार रुपयाची रोकड चोरट्याने लंपास केली. रक्कम चोरीला गेल्यानंतर प्रौढाची शुगर वाढल्याने त्यांनी पोलिसात कच्ची तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी आठ दिवसांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला

jalgaon bus stand

बोरीस (ता. धुळे) येथील ज्ञानेश्वर मुरलीधर पाटील (वय ४९) यांना शुगर असल्याने डोळ्याने दिसणे एकदम कमी झाल्याने ते जळगावातील एका
नेत्र रुग्णालयात दोन महिन्यांपासून उपचारासाठी येत होते. पुढील उपचारात त्यांना १५ हजार रुपये किंमतीचे १० इंजेक्शनचा कोर्स सांगण्यात आला होता. त्यासाठी ते रक्कम घेऊन १८ जून रोजी पत्नीसह जळगावात आले होते. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी इंजेक्शनचा कोर्स करण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी १९ रोजी सकाळी ८ वाजता ते पत्नीच्या बहिणीच्या घरुन निघून नविन बसस्थानकात आले.

जळगाव-नाशिक बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिश्यात ठेवलेली १ लाख ७ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना लक्षात आले.त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांची शुगर वाढून त्यांची प्रकृती खराब झाली. त्यामुळे कच्ची नोंद करुन उपचारासाठी पाटील दाम्पत्य धुळ्याला निघून गेले. दोन दिवसांपूर्वी बसस्थानकात चोऱ्या करणाऱ्या तिघांना पकडण्यात आले. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरुन त्यांना फोन करुन तक्रार देण्यासाठी बोलावून घेतल्याचे पाटील यांच्या पत्नीने सांगितले.दरम्यान, नवीन बसस्थानकात चोऱ्याचे प्रमाण वाढले असून पोलिस प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now