मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी विकास चव्हण तर तालुकाध्यक्षपदी संतोष शेलोडे

जून 28, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२५ । पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा देणाऱ्या मराठी पत्रकार संघातर्फे २३ जून रोजी पुण्यातील सिम्बायोसिस सभागृहात ‘नेशन फस्ट’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मराठी पत्रकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात जळगाव जिल्हाध्यक्षपदी पत्रकार विकास प्रभाकर चव्हाण, भुसावळ तालुकाध्यक्षपदी पत्रकार संतोष शोलोडे तर जिल्हा सरचिटणीसपदी मनोज निळे यांची निवड करण्यात आली. संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी नियुक्तीपत्र देत पदाधिकाऱ्यांची निवड केली.

vikas chavan

पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा तसेच सामाजिक उपक्रमात मराठी पत्रकार संघ नेहमीच आग्रेसर आहे. सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून पुण्यात सोमवारी ‘ नेशन फस्ट’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख आतिथी म्हणून केंद्रीय रस्ते-वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक शां.ब. मुजुमदार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, सुनील माळी, भावेश शिंगोटे, राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक आनंद रेखी, सुशील जाधव आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, संदीप पारोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात युद्धात आपला अवयव गमविलेल्या सैनिकांचा गौरव करण्यात आला.

याचवेळी पत्रकारीतेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा देखील गौरव करण्यात आला. प्रसंगी संघटन वाढीच्या दृष्टीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली. यात पत्रकर विकास चव्हाण यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी, संतोष शेलोडे यांची भुसावळ तालुकाध्यपदी तर मनोज निळे यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now