आषाढी निमित्त वारकऱ्यांसाठी टोल सवलत; प्रवेशपत्रासाठी जळगाव आरटीओमध्ये विशेष कक्ष

जून 28, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२५ । आगामी आषाढी एकादशी (२०२५) निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या व परत येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांना दिलासा देणारी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी दिली आहे.

tolnaka

दिनांक १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत पंढरपूरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या हलक्या व जड वाहनांसाठी पथ करातून (टोल) सूट देण्यात आलेली आहे. या सूटचा लाभ घेण्यासाठी विहीत नमून्यात सवलत प्रवेशपत्र आवश्यक असून, ते मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

हा विशेष कक्ष दररोज सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील. प्रवेशपत्र जारी करण्याचे काम याच वेळेत पार पडणार आहे. तरी सर्व भाविक व वाहनचालकांनी याची नोंद घेऊन वेळेत प्रवेशपत्र मिळवावे, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now