जळगावात दोन ट्रक एकमेकांना धडकले ; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

जून 28, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२५ । जळगाव भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा चालक जखमी झाला. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनाच्या लांबस लांब रांगा दिसून आल्या.

jl acd

या घटनेबाबत असे की, ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक ओडी 15 सी.2963) व राजस्थान पासिंगचा ट्रक (क्रमांक आर.जी.14 जेटी 0421) यांच्यात जळगाव शहराबाहेरील भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिराजवळ भीषण अपघात झाला आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, दोन्ही ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा दबला जाऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तर दुसऱ्या चालकाला देखील दुखापत झाली असून त्याच्या एक डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांच्या माध्यमातून तातडीने सुरू करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा पंचनामा सुरू केला असून पुढील कार्यवाही करत आहेत. मृत पावलेला ट्रक चालक केबिनमध्ये पूर्णपणे अडकला होता. स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने केबिन ओढून चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now