गिरणेच्या जलसाठ्यात वाढ ; आता धरणात किती टक्के जलसाठा?

जून 24, 2025 1:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२५ । नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार झाला. यामुळे अर्धा जळगाव जिल्ह्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाच्या पातळीतही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. गिरणा धरणातील जलसाठ्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील पावसामुळे हतूनरसह शेळगाव बॅरेज प्रकल्पातील दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडल्यामुळे तापी नदी खळाळून निघाली आहे.

girna dam

जून महिन्याच्या सुरुवातीला गिरणा धरणातील जलसाठा २१ टक्क्यांवर आला होता. जून मध्यान्हात हा साठा २२ टक्क्यांवर आला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने २४ जूनअखेर गिरणा धरणातील साठा २५ टक्क्यांवर गेला आहे. गिरणा धरण नाशिक जिल्ह्यात असले तरी त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास होतो. त्यामुळे गिरणेच्या पाणी पातळीत वाढ होत असताना, जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गिरणा धरण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर व पारोळा व जळगाव तालुक्यातील दीडशेपेक्षा जास्त गावे तसेच चार नगरपालिकांच्या पाण्याची तहान भागवितो.

दुसरीकडे २५५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेल्या तापी नदीवरील हतनूर धरणात २२ जूनअखेर १३९.५० दशलक्ष घनमीटर (५४.७१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी जेमतेम २७.६९ टक्के पाणीसाठा होता. यंदा परिस्थिती चांगली असताना हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात, तसेच मध्य प्रदेशात दमदार पाऊस झाला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने हतनूर धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहेत.

तीन प्रकल्प शून्यावर
जून महिना संपत आला आहे. तरीही बोरी, भोकरबारी आणि अग्नावती प्रकल्पांतील जलसाठा शून्यावरच आहे. गेल्यावर्षी २३ जून रोजी जिल्ह्यातील सहा प्रकल्पांमधील जलसाठा शून्यावर होता.

मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट
जळगाव जिल्ह्यात एकूण १४ मध्यम सिंचन प्रकल्प असून, त्यांची पाणी साठवण क्षमता ३१४.१५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. १५ जून रोजी या सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये २७.६८ टक्के उपयुक्त पाणी साठा होता. त्या तुलनेत २४ जून रोजीचा उपयुक्त साठा ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाणी साठ्यातील पाच टक्के वाढ ही सातपुड्यातून उगम पावणाऱ्या नद्यांवरील अभोरा, मंगरूळ, सुकी, गूळ या प्रकल्पांमुळे झाली. बहुळासह हिवरा, तोंडापूर, मन्याड, अंजनी, अग्नावती, भोकरबारी आणि बोरी या प्रकल्पात अजूनही पाण्याचा ठणठणाट कायम आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment