जळगावात मुसळधार पाऊस कोसळणार ; आगामी पाच दिवस असे राहणार हवामान?

जून 24, 2025 11:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२५ । राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. जळगाव जिल्ह्यातही मागच्या काही दिवसापासून पाऊस होत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून अशातच हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

rain 1 2 jpg webp

जून महिना संपायला आता अवघा आठवडा उरला आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाहीय. जोरदार पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला आहे. जून महिन्यातील सरासरीपेक्षा जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. मात्र, कमी पावसाची ही तूट आगामी दोन दिवसांत भरून निघण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यासाठी २५ व २६ जून या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.काल सोमवारी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला. आज मंगळवारी सकाळपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु आहे.

गेल्या वर्षापेक्षा २८ मिमी कमी पाऊस
जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात एकूण १२३ मिमी पाऊस होत असतो. यंदा २२ जूनपर्यंत ७१ मिमी पाऊस झाला आहे. तर गेल्या वर्षी जिल्ह्यात २२ जूनपर्यंत २९ मिमी पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा २८ मिमी कमी पाऊस झाला आहे.

आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज
दिनांक.. वातावरणाची स्थिती…अलर्ट
२४ जून : हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस… ग्रीन अलर्ट
२५ जून : मध्यम ते जोरदार पाऊस… यलो अलर्ट
२६ जून : वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस… यलो अलर्ट
२७ जून : हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस… ग्रीन अलर्ट
२८ जून : हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.. ग्रीन अलर्ट

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment