भरधाव कारने एका महिलेसह तिघांना उडविले ; जळगावातील थरार घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

जून 20, 2025 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहे. यातच जळगाव शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात भरधाव वेगाने आलेल्या कारने एका महिलेसह तिघांना उडविले. ही थरारक घटना शहरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपी कारचालकास ताब्यात घेण्यात आलं आहे. या दुर्दैवी घटनेत जबर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती अतिशय चिंताजनक असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

acd jl

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ परिसरात एक भरधाव कारने महिलेला उडवले. त्यामुळे ती महिला एखाद्या फूटबॉलसारखी हवेत 15 ते 20 फूट उंच उडून धाडकन खाली आपटली. त्यात ती जबर जखमी झाली. मात्र त्यानंतरही कारचालक थांबला नाही, खाली पडल्यावर त्याच वाहनाने महिलेला 100 ते 200 मीटरपर्यंत फरफटत नेलं. हा सगळा धक्कादायक प्रकार त्या रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

आपण नक्की काय करतोय हे सुद्धा त्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाला समजत नव्हतं, त्याने कार तशीच पुढे रेमटवली आणि एका घराच्या बाहेर ओट्या तसेच बाकड्यांना सुद्धा जोरदार धडक दिल्याने नुकसान झाले. त्याने अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या महिलेसह एकूण तिघांना उडवलं. हा सगळा भयाक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे धक्कादायक फुटेज समोर आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपी मद्यधुंद चालक आणि त्याची कार, हे दोन्ही ताब्यात घेतलं असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या घटनेत जबर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती अतिशय चिंताजनक असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जळगावमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment