मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न, जळगाव शहरातील धक्कादायक प्रकार

जून 20, 2025 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२५ । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीची रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळाल. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. ही घटना जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली.

jl2

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जळगाव शहरामध्ये दाखल होताच या ताफ्यामध्ये घुसून एखा व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात ही घटना घडली. संजय वराडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. संजय यांनी अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला.

शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने संजय वराडे या ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी संजय यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यामुळे शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment