Gold Silver Rate : जळगावच्या सुवर्णबाजारात चांदीने गाठला नवा सार्वकालिक उच्चांक; सोने घसरले

जून 18, 2025 8:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२५ । इस्रायल- इराण युद्धामुळे सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहे. जळगावच्या सुवर्णबाजारात चांदी दरात एकाच दिवसात २ हजारांची वाढ होऊन चांदीचे दर १,११,२४० रुपये किलोच्या नव्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले तर सोने २०० रुपयांनी स्वस्त झाले आहे

gold silver jpg webp

चांदी १२ जूनपासून १,०९,१८० रुपये किलोवर स्थिर होती. इराणने निकराच्या युद्धाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी दुपारपासून चांदीत २ हजारांची वाढ झाली. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाली. मंगळवारी मात्र सोन्यात २०० रुपयांची घसरण झाली. सोमवारी १,०२,५८८ रुपये तोळा असलेले सोने १,०२,३८२ रुपयांवर स्थिरावले.

१ जूनला चांदी १,०१,४५५ रुपये किलो होती. ५ जूनला एकाच दिवसात चार हजारांची तेजी आली. नंतर ५ जूनपासून १२ जूनपर्यंत १,०८, १५० रुपये किलो होती. नंतर एक हजारांची वाढ पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता झाल्याने १३ जूनला ती १,०९,१८० रुपये झाली. तर १३ जूनपासून १६ जूनपर्यंत चार दिवस १,०९,१८० रुपयांवर स्थिरावली होती. १७ जूनला इस्त्रायल इराणमधील युद्धाच्या भडक्याने एकाच दिवसात दोन हजारांची वाढ झाली आहे.

कच्च्या तेलाचे दर वाढल्याने चांदीच्या किमतीवर परिणाम :
दोन्ही देशांतील युद्ध दीर्घकाळ चालण्याचे संकेत आणि कच्च्या तेलाचे दर वाढल्याने चांदीत झळाळी आली. त्यात आणखी दरवाढ होणे शक्य आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

जळगावचे दर
सोने (शुद्ध) : १०२३८२ (-२००)
चांदी : १,११,२४० (+२,०००)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment