मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला ; या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा शक्यता, जळगावला…

जून 18, 2025 8:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२५ । वेळेच्या आधीच दाखल झालेल्या मॉन्सूनने मंगळवारी महाराष्ट्र व्यापला असून यामुळे हवामान खात्याकडून राज्यात आगामी चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

monsoon jpg webp

हवामान खात्याने आज (ता. १८) कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गुजरात आणि परिसरावर, तसेच पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत. पश्‍चिम बंगालमधील कमी दाब प्रणाली वायव्येकडे सरकत असून, तिची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर गुजरातमधील प्रणाली हळूहळू निवळून जाणार आहे. या प्रणालीपासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मुंबई, ठाणे, नाशिकचा घाटमाथा.

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment