पाऊस पुन्हा परतला ; जळगावात आगामी पाच दिवस असं राहणार हवामान?

जून 13, 2025 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२५ । जळगावसह राज्यात मागच्या काही दिवसापासून गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा परतला आहे. मागच्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात बुधवारी रात्री अचानक झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, यामुळे शेतीसह बरेच नुकसान झाले आहे. दरम्यान, जळगावात आगामी तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

rain 2 jpg webp

जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी व मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बाष्पाचे प्रमाण आहे. त्यात गेल्या आठवडाभरापासून पावसानेही उसंत घेतली आहे. यामुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका लागत आहे.दुसरीकडे उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले. बुधवारी दिवसाचा पारा ४० ते ४१ अंशापर्यंत पोहोचला होता. मात्र मागच्या दोन दिवसात वादळी पावसाच्या सावटामुळे तापमानात घसरण झाली. गुरुवारी जळगावचे तापमान ३८ अंशावर होते. बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे केळीचे नुकसान झाले आहे. यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मोठ-मोठे वृक्ष कोलमडून पडले आहेत. बुधवारी रात्री निर्माण झालेल्या वादळाच्या रेकॉर्डब्रेक वेगाची नोंद झाली

आगामी तीन दिवस पुन्हा ‘यलो अलर्ट’
दिनांक, तापमान, हवामानाची स्थिती
१३ जून : ३८ अंश….’यलो अलर्ट’, ४० ते ५० किमी वेगाने वाऱ्यांसह पाऊस
१४ जून : ३८ अंश….’यलो अलर्ट’, ४० ते ५० किमी वेगाने वाऱ्यांसह पाऊस
१५ जून : ३९ अंश….’यलो अलर्ट’, ४० ते ५० किमी वेगाने वाऱ्यांसह पाऊस
१६ जून : ३८ अंश…. काही अंशी पाऊस,
१७ जून : ३७ अंश….तुरळक पाऊस, दिवसभर ढगाळ वातावरण

जळगांव जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमान आकडेवारी (MM
दि 13/6/2025
अमळनेर-9
यावल -1
पाचोरा -2
भडगांव -6
रावेर -4
चोपडा -18
चाळीसगाव -10
बोदवड-5
धरणगाव -18
भुसावळ -0.2
Muktainagar -0
Erandol -25
Parola -43

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment