जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) परीक्षा २०२५ साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. विषेश पदवी पास तरुणांना मोठी संधी असून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे SSC CGL Bharti 2025

या भरतीद्वारे एकूण १४,५८२ जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी, आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै सकाळी ११ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी मुदतीआधी अर्ज करावा. SSC CGL Recruitment 2025

ही पदे भरली जाणार?
1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4) इंस्पेक्टर
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6) सब इंस्पेक्टर
7) सेक्शन हेड
8) एक्झिक्युटिव असिस्टंट
9) रिसर्च असिस्टंट
10) डिविजनल अकाउंटेंट
11) सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
13) स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
14) ऑफिस सुपरिंटेंडेंट
15) ऑडिटर
16) अकाउंटेंट
17) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
18) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
19) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
20) सिनियर एडमिन असिस्टंट
21) टॅक्स असिस्टंट
22) सब-इंस्पेक्टर (NIA)
शैक्षणिक पात्रता:
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा :
पदानुसार वयोमर्यादा १८-३० वर्षे, २० ते ३० वर्षे, १८-३२ वर्षे किंवा १८ ते २७ वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. वयोमर्यादा निश्चित करण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२५ असेल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल केली जाईल.
अर्ज शुल्क
एसएससी सीजीएल २०२४ साठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. आरक्षणासाठी पात्र असलेल्या महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (पीडब्ल्यूबीडी) आणि माजी सैनिक (ईएसएम) यांच्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा












