लाडकी बहीण योजना बंद पडणार का? जळगावात उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

जून 6, 2025 8:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. आतापर्यंत ११ हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. दरम्यान ही योजना बंद पडणार का? या योजनेमुळे सरकार अडचणीत आलं आहे का? अशा अनेक चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूर्णविराम दिला आहे.

ladki bahin

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही. या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही. लाडक्या बहिणींसाठीची आर्थिक तरतूद आहे, ती सरकारनं केलेली आहे. दर महिन्याला देण्यात येणाऱ्या पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे. संतांच्या लाडक्या बहिणीच्या मुक्ताईच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे. तिथल्या वारकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो’, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते जळगावात बोलत होते.

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या सामाजिक न्याय खात्याचा ४१० कोटीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असल्याची माहिती समोर आली होती. तसेच मागच्या महिन्यात देखील आदिवासी खात्याच्या निधीचा वापर लाडकी बहीण योजनेसाठी वापरला असल्याची माहिती माध्यमांमध्ये झळकली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना पुरेसा निधी देत नसल्याची खंत देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली होती. या सगळ्यावर आज मंत्री संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता संजय शिरसाटांनी काढता पाय घेतला. इतकंच नाही तर शिंदेच्या मंत्र्यांना निधी मिळतो का? असा सवाल केल्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमप्रतिनिधीना हात जोडले आणि आपल्या कार चालकाला चल रे अस म्हणत तेथून पळ काढला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment