प्रेमाच्या जाळ्यात फसवून तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न फसला ; जळगावात दोघांवर गुन्हा दाखल

जून 5, 2025 10:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे महाविद्यालयातील ओळखीच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आंतरजातीय विवाहासाठी तिला स्वत:च्या धर्माची शिकवण देणाऱ्या तरुणाने जळगावात येऊन तिला बुरखा घालायला लावला आणि बुरखा काढला तर जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून फरहान हकीम खाटीक (२३) याच्यासह तिच्या मित्रावर रामानंद पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविला .

love jihad

नेमका प्रकार काय?
यावल तालुक्यातील एका गावातील ही २२ वर्षीय तरुणी आणि शेजारच्या गावातील फरहान हकीम खाटीक (२३) हे चोपड्यातील एकाच महाविद्यालयात शिकतात. प्रवासात त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यातून त्यांचे समाज माध्यमावर तरुणीला धमकावून बुरखा घालायला लावलाबोलणे होत होते. त्यात या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. धर्म वेगळे असले तरी प्रेम हे प्रेम असते असे सांगत तिला स्वत:च्या धर्माची शिकवण देणाऱ्या पोस्ट पाठवल्या. तिला आत्महत्येची धमकी देऊन लग्नासाठी होकार मिळवला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बुधवारी ही तरुणी जळगावातील एका सुपर शाॅपमध्ये आली होती. तिथे येऊन फरहान आणि त्याचा मित्र जमील कुरेशी यांनी तिला बुरखा घालायला सांगितला. तिने बुरखा परिधान केल्यावर तिच्यासोबत त्यांनी खरेदी केली. बिलाचे पैसे देताना तिने बुरखा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा तिला विरोध करण्यात आला. त्यावेळी इतरांनी चौकशी केली तेव्हा या तरुणीने झाला प्रकार इतरांना सांगितला. त्यानंतर त्या दोन्ही तरुणांना रामानंद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तरुणीच्या फिर्यादीवरून त्या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला .

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment