दुचाकी अन् कारच्या धडकेत एक ठार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

जून 1, 2025 8:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२५ । मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या पुलावर दुचाकी आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला आहे. रमेश पांडुरंग माळी (वय ४५) असं अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

purna acd

प्राप्त माहितीनुसार, रमेश माळी हे इको कार (एमएच १९, ईजी ११४०) घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकल (एमएच १९ ईएच ७५८५) सोबत जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत रमेश माळी गंभीर जखमी झाले. अपघात होताच घटनास्थळी उपस्थित सचिन झनके यांनी तात्काळ दीपक रामदास माळी (रा. मुक्ताईनगर) यांना माहिती दिली. दीपक माळी आणि अविनाश बाविस्कर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून रमेश माळी यांना उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे हलवले.

मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रमेश माळी यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दीपक रामदास माळी यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पवन सपकाळ पुढील तपास करीत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment