Jalgaon : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांसाठी भरती ; उमेदवारांनी असा करावा अर्ज?

मे 30, 2025 6:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह, जळगाव येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने वसतिगृह अधिक्षिका (2 स्त्री), पहारेकरी/कम एस्पायस (2 पुरुष) , सफाई कर्मचारी (2 स्त्री) आणि स्वयंपाकी(४ स्त्री) ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत.

job jpg webp

माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झालेस नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १० जुन २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत.

भरती प्रक्रियेसाठी माजी सैनिकांच्या पत्नी, वीरपत्नी आणि सामान्य महिलांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. पात्र उमेदवारांनी अर्जासोबत आधारकार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, दोन फोटो आणि पोलिस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० जून २०२५ असून, अर्जदारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक ०२५७–२२४१४१४ या वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment