Gold Rate : सोन्याचे दर 107000 रुपयांवर जाणार? जळगावातील आताचे दर तपासा..

मे 27, 2025 11:08 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२५ । सोने दरात चढ उतार सुरूच आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात घसरण झाली. सोमवारी (२६ मे) सोन्याचे दर ३०० रुपयांनी घसरले. त्यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचे दर ९६,००० ( जीएसटीसह ९८८८०) रुपयांवर खाली आले. तर चांदीचा दर प्रति किलो ९९००० रुपये इतका आहे. दरम्यान, ही घसरण सामान्य असल्याचे सोने बाजाराच्या जाणकारांचे म्हणणे आहे.

gold jpg webp

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली होती. सोन्याचे दर जवळपास २७०० ते २८०० रुपयांनी महागले. त्यामुळे सोने शुक्रवारी ९६,३०० (जीएसटीसह ९९१९८) रुपयांवर पोहोचले होते. ते पुन्हा एक लाखाचा टप्पा पार करेल, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा होती. मात्र, त्यात घसरण झाली. आगामी काळात सोन्याच्या दरात पुन्हा उच्चांक गाठण्याचा अंदाज आहे.

ट्रम्प सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी विविध देशांवर व्यापारी धोरणाचे वेगवेगळे दर जाहीर केले. त्याचे पडसाद समोर आल्याने तीन महिन्यांसाठी १० टक्के दर ठरवले. त्याची मुदत येत्या १५ दिवसांत संपेल. त्यामुळे ट्रम्प सरकार नव्याने टेरिफ रेट जाहीर करेल. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय जगतात पडून सोने बाजारावर परिणाम होईल आणि सोन्याचे दर पुन्हा उच्चांकी पातळीवर जातील. अर्थात, ते १,०५,००० लाखांचा टप्पा पार करून १,०७,००० रुपयांवर जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, चांदीचे दर गेल्या आठवडाभरापासून स्थिर असून ते कायम राहण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment