Parola : टोल नाक्यावर दोन गटांमध्ये भीषण हाणामारी, 8 जण जखमी

मे 27, 2025 10:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२५ । पारोळा तालुक्यात असलेल्या सब गव्हाण टोल नाक्यावर दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून यामुळे खळबळ उडाली. या हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ जण जखमी झाले आहे. तर त्यापैकी पाच जण असून गंभीर असल्याची माहिती समोर आली. जखमींना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

parola video

व्हिडीओ व्हायरल:
दरम्यान या सर्व हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक दिवसांपूर्वी टोलनाक्यावर वाद झाला होता त्याच वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. व्हायरल व्हिडिओत दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर दगडांनी आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहीजण रस्त्यावर पडून असताना त्यांच्यावरही बेधडक मारहाण सुरू होती.

या हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नशिराबाद टोळीतील दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment