Gold Rate : सोन्याने घेतली पुन्हा उसळी, ‘या’ आठवड्यात जळगावच्या सुवर्णपेठेत झाली मोठी वाढ

मे 25, 2025 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२५ । मागच्या काही दिवसात सोने दरात बराच चढ उतार दिसून आले. गेल्या आठवड्यात एक लाख रुपयापर्यंत गेलेल्या सोने दरात घसरण झाली होती. मात्र या आठवड्यात सोने दरात पुन्हा वाढ झालीय. दरवाढीमुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. यामुळे सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात येत आहे.

gold rate 2

जळगाव सराफ बाजारात शनिवार सोने दरात ७०० रुपयाची वाढ झाली. यामुळे आज रविवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ९६३०० (जीएसटीसह ९९,१८९) पोहोचला आहे. तर चांदीचा दर विनाजीएसटी ९९,००० रुपयांवर आले आहे.

खरंतर गेल्या या आठवड्याच्या पहिल्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ९३,६०० रुपयावर होता. त्यात या आठवड्यात मोठी वाढ दिसून आली. आज सोने दर ९६३०० पोहोचले आहे. त्यामुळे या आठवड्यात सोने दरात तब्बल २७०० रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. तर चांदी दरात २००० रुपयांपर्यंतची वाढ झालीय. दरम्यान सद्याची वाढ पाहता पुन्हा सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या पुढे जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, भू-राजकीय तणावात त्यासोबतच अमेरिकेच्या आर्थिक वाढीबाबत अनिश्चितता, डॉलरमध्येही कमकुवतपणा व अमेरिका चीन व्यापार तणावामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं जाणकारांनी म्हटलं आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment