आनंदवार्ता ! ८ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

मे 24, 2025 4:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२५ । मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. सामान्य तारखेच्या ८ दिवस आधीच म्हणजेच आज २४ केरळात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. दरम्यान, मान्सूनने गोव्याच्या वेशीवर म्हणजे उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंत धडक दिली आहे. तसेच मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांत पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

mns 2025

मान्सूनचे यंदा सामान्य तारखेच्या ८ दिवस आधीच केरळमध्ये आगमन झाले. याआधी मान्सून २००९ साली २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर १६ वर्षांत मान्सून केरळमध्ये वेळेआधीच दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.


मान्सूनने २४ मे रोजी दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप भाग, केरळ, माहे, कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग, ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment