Jalgaon : स्वयंपाक करताना आगीचा भडका ; गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मे 22, 2025 6:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२५ । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी घरामध्ये स्वयंपाक करत असताना अचानक आगीचा भडका उडाल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. उषा गुलाब मोरे (वय ५०, रा. रामेश्वर कॉलनी) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 5 jpg webp

रामेश्वर कॉलनी राहणारे उषा मोरे यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. उषाबाई यांचा मुलगा दिनेश हा रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. दरम्यान, रामेश्वर कॉलनी येथील घरात एक महिन्यापूर्वी दि. २४ एप्रिल रोजी त्या स्वयंपाक करीत होत्या. तेव्हा अचानक आगीचा भडका उडून उषाबाई मोरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्या गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे मेहरूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment