जळगावच्या सुवर्णपेठेत सोने 1700, तर चांदी 1000 रुपयाची वाढ ; आताचे दर तपासून घ्या

मे 22, 2025 10:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२५ । सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत गेल्या २४ तासात सोन्याच्या दरात तब्बल १७०० रूपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा दरही वधारला आहे. यामुळे सोने आणि चांदीच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

gold silver 1 jpg webp

जळगावच्या सराफा बाजारात बुधवारी सोने एकाच दिवसात १७०० रुपयांनी वाढून ९५,६००(जीएसटीसह ९८४६८) प्रति तोळ्यावर स्थिरावले. तर दुसरीकडे चांदी दरात किलोमागे १००० रुपयांची वाढ झाल्याने चांदी पुन्हा लाखावर (जीएसटीसह १,००९४०) पोहोचली आहे.

मंगळवारी सोने जीएसटीसह ९६७१७ रुपये तर चांदी ९९९१० रुपये किलो होती. गेल्या काही दिवसांपासून सोन्याने चांदीच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्याचा पाहायला मिळत आहे. रशिया युक्रेनमध्ये जो करार होणार होता तो आता पुढे ढकलण्यात आला आहे त्यामुळे जिओ पॉलिटिकल टेन्शन आल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दारावर झाल्यास सोने व्यावसायिकांनी सांगितलं..

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. भविष्यात पुन्हा सोन्याचे दर वाढतील या भीतीने घरात लग्न असलेले मंडळी आजच सोने खरेदी करत असल्याचा सुद्धा व्यापार्‍यांनी सांगितला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment