भुसावळमार्गे आणखी एक नवीन ट्रेन सुरु ; कुठून कुठपर्यंत धावणार

मे 8, 2025 11:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला. जळगाव, भुसावळकर प्रवाशांची सोय झाली आहे.

train

रेल्वे क्र. ०४२११ लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर ही विशेष गाडी ६ मे ते २४ जून दरम्यान धावणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी दु. ४.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून रवाना होईल. भुसावळला ही गाडी मध्यरात्री १२.४५ला येईल तर १२.५० ला रवाना होईल. मुंबई ते सुलतानपूर गाडीच्या आठ फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०४२१२ ही गाडी ५ मे ते २३ जूनपर्यंत दर सोमवारी सुलतानपूर येथून सुटेल.

या स्थानकांवर थांबेल?
ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमळापती, बिना ज. झासी, ओराई, कानपुर आणि लखनौ या स्थानकांवर थांबेल

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “भुसावळमार्गे आणखी एक नवीन ट्रेन सुरु ; कुठून कुठपर्यंत धावणार”

Leave a Comment