खुशखबर! आजपासून दोन नव्या एक्सप्रेस धावणार, जळगावकरांना होणार मोठा फायदा

मे 3, 2025 11:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने दोन नवीन गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एमजीआर चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी, तर पुण्यातील हडपसर-जोधपूर एक्सप्रेस या दोन नवीन गाड्या आजपासून सुरु केल्या जाणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नव्या या ट्रेनचा शुभारंभ होणार आहे. विशेष विशेष यातील एक गाडी ही जळगाव आणि भुसावळमार्गे धावणार आहे.  आज होणार दोन नव्या एक्स्प्रेसच्या गाड्यांचा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते

chennai jodhpur

गाडी क्र २०६२५ एमजीआर चेन्नई ते भगत की कोठी, जोधपूर (राजस्थान) पर्यंत आठवड्यातून पाच दिवस धावेल. २०६२५ चेन्नई ते जोधपूर (भगत की कोठी) ही गाडी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी चेन्नईहून संध्याकाळी ७:४५ वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता जोधपूरला पोहोचेल. २०६२६ भगत की कोठी (जोधपूर) ते चेन्नई ही गाडी दर रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी ५:३० वाजता भगत की कोठी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११:१५ वाजता चेन्नईला पोहोचेल.विशेष या गाडीला भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा असणार असल्यामुळे जळगावकर प्रवाशांची सोय होणार आहे.

एक्स्पप्रेसची भुसावळ आणि जळगावला वेळ काय असणार ?
चेन्नई सेंट्रल येथून निघाल्यावर दुसऱ्या दिवशी भुसावळ रेल्वे स्थानकांवर दुपारी ४ वाजून ५ मिनिटाने पोहोचले. तर जळगावला ती दुपारी ४ वाजून ४७ मिनिटाला पोहोचले. तर ही ट्रेन भगत की कोठी, जोधपूर येथून निघाल्यावर जळगावला दुसऱ्या दिवाशी रात्री १२.२५ मिनिटाने पोहोचले. तर भुसावळला १२.५० मिनिटाने पोहोचले.

नवीन एक्सप्रेस कोण कोणत्या स्थानकावर थांबणार?
चेन्नई, सुलुरपेट्टा, गूतूर, नेल्लोर, औंगोले, विजयवाडा, खम्मम, वारंगल, बल्हारशाह, चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, साबरमती, महेसाणा, राणीवाडा, बल्हरिवाडा, बल्हाड, बल्लापूर, जल्दी, बडनेरा कोठी.

या ट्रेनमध्ये एकूण २२ कोच असतील – ६ सेकंड स्लीपर, ४ थर्ड एसी, ४ थर्ड एसी इकॉनॉमी, २ सेकंड एसी, ४ जनरल, १ पॉवरकार आणि १ गार्ड कोच.

दुसरीकडे पुण्यातून आजपासून जोधपूरला नवीन एक्सप्रेस धावणार आहे. ०१४०१ हडपसर (पुणे) – जोधपूर एक्सप्रेस पुणे येथून दि. ३ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता पोहोचेल, तर गाडी क्रमांक ०१४०२ जोधपूर – पुणे एक्सप्रेस (एकेरी विशेष) जोधपूर येथून दि. ४ मे रोजी रात्री साडेआठ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “खुशखबर! आजपासून दोन नव्या एक्सप्रेस धावणार, जळगावकरांना होणार मोठा फायदा”

Leave a Comment