ग्राहकांसाठी खुशखबर! सोने दरात 5300 रुपयांची घसरण, जळगावात आता असे आहेत भाव?

मे 3, 2025 10:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२५ । मागच्या महिन्यात सोने दराने लाखाचा टप्पा गाठल्यानंतर आता घसरण होताना दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली. शुक्रवारी सोन्याचा दर प्रति तोळा ५०० रुपयांनी घसरला. यामुळे आता तोळ्यामागे भाव ९४ हजार रुपयांवर आले. दरम्यान, २२ एप्रिल रोजी ९९ हजार ३०० रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोने भावात दहा दिवसांतच ५३०० रुपयांची घसरण झाली आहे हे विशेष.

gold silver jpg webp

जळगाव सराफ बाजारात आज शनिवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९४५०० रुपये तर २२ कॅरेटचा भाव विनाजीएसटी ८६,६२८ रुपये रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तसेच चांदीचा दर विनाजीएसटी ९७००० रुपये प्रति किलो इतका आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव सातत्याने वाढत गेले. या भाववाढीमुळे २२ एप्रिलला सोने ९९ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यापर्यंत पोहोचले.मात्र, नंतर ते भाव कमी-कमी होत आहे. त्यात आता तीन दिवसांपासून तर दररोज घसरण होत आहे.

२९ एप्रिल रोजी ९६ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोने भावात ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सकाळी १३०० रुपयांची घसरण होऊन ९५ हजार २०० रुपयांवर आले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्यात ८०० रुपयांची वाढ होऊन ते ९६ हजार रुपयांवर पोहोचले. मात्र, २९ एप्रिलच्या तुलनेत त्यात ५०० रुपयांची घसरणच नोंदविली गेली. १ मे रोजी तर थेट दोन हजार रुपयांची घसरण झाली. तर काल शुक्रवारी ५०० रुपयाची घसरण झाली. दरम्यान, मागच्या दहा दिवसात सोन्याचा दर ५३०० रुपयांनी घसरला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment