देशावर युद्धाचे सावट, पावसाची स्थिती सर्वसाधारण राहील; ‘भेंडवळ’ची भविष्यवाणी जाहीर

मे 1, 2025 8:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२५ । साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत आज बुलढाण्यातील भेंडवळ येथे भाकीत वर्तविण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंधेला ही घट मांडणी करण्यात आल्यानंतर आज अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यानुसार या घटमांडणीमधून यंदा देशावर मोठे संकट, राजकीय तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची आणि शेतीची स्थिती अनिश्चित राहणार असल्याचेही सांगितले गेले आहे.सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकीत वर्तवलं आहे.

bhendwal bhavishyavani 2022 jpg webp

वर्षभर देशावर युद्धाचे सावट असेल, पण युद्ध होणार आहे. राजा म्हणजेच पंतप्रधान तणावात राहतील. पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल. युद्धजन्य परिस्थिती होईल मात्र युद्ध होणार नाही. असे भाकीत भेंडवळने वर्तवले आहे. देशात पाणी आणि पाऊस याची अनिश्चिता असेल, असे भाकितही वर्तवण्यात आले.

बुलढाण्यात पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी भेंडवळची परांपरा आहे. ऐतिहासिक आणि मोठं संस्कृतिक महत्व असलेल्या भेंडवळची अक्षय्य तृतीय्येला घटमांडणी होते अन् दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवले जाते. आज सकाळी सूर्योदय होण्याआधी भेंडवळचे भाकीत वर्तवण्यात आले.

देशावर मोठं संकट –
साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम ठेवत आज भेंडवळ येथे बाकी वर्तविण्यात आली. पुंजाजी महाराज यांनी सांगितले की, यंदा पिकांची परिस्थिती सर्वसाधारण राहील, तर पाऊसही सर्वसाधारणच पडेल, परंतु अनिश्चितता जास्त दिसून येईल. भाकितातून देशावर मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून, राजकीय तणाव वाढेल, असे संकेत आहेत. तसेच, पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याची भीतीही या भाकितातून व्यक्त करण्यात आली आहे.

पावसाची स्थिती कशी असेल?
भेंडवळ येथील भाकितानुसार, यंदा पावसाची स्थिती सर्वसाधारण राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल. महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाऊस हा देखील सर्वसाधारण पातळीवर राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल. याचा अर्थ, काही ठिकाणी पिकांना योग्य पाणी मिळेल, तर काही भागात पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो. शेती उत्पादनात स्थिरता राहील, परंतु अपेक्षित वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment