रेशनकार्डधारकांनो..! आजच ‘हे’ काम करा, अन्यथा मोफत धान्य मिळणार नाही

एप्रिल 30, 2025 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२५ । केंद्र सरकारकडून गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्डवर नागरिकांना अन्नधान्य मिळते. यामध्ये गहू, तांदूळ, साखर अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला मोठा आधार मिळत आहे. परंतु आता अनेकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचे कार्ड आता बंद होणार आहे.रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख आज ३० एप्रिलची आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केले नसेल तर आजच करा. काही तासांतच तुम्हाला रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत संपणार आहे. यापुढे मुदत वाढणार देखील नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ration card

केंद्र सरकारने नागरिकांना रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य केले असून यासाठी रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च होती. परंतु अनेकांना केवायसी केले नसल्याने ही मुदत अजून १ महिन्यासाठी वाढवण्यात आली. त्यामुळे आज रेशन कार्ड केवायसी करण्याची ही शेवटची तारीख आहे. लवकरात लवकर रेशन दुकानावर जाऊन केवायसी करुन घ्या. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनेदेखील केवायसी करु शकतात.जर तुम्ही केवायसी केले नसेल तर तुमचे रेशन कार्डवरुन नाव काढले जाणार आहे. तुम्हाला मोफत धान्य मिळणार नाही.

केवायसी करण्याची ऑनलाइन पद्धत
सर्वप्रथम तुम्हाला Aadhaar FaceRD हा अॅप डाउनलोड करायचा आहे.
यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते ठिकाण टाकायचे आहे.
यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमच्या फोनवर ओटीपी येईल तो टाका.
यानंतर Face-e-kyc हा ऑप्शन येईल. तो निवडा.
यानंतर तुमचा फोटो अपलोड करा. अशा पद्धतीने तुमचे केवायसी पूर्ण होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment