---Advertisement---
राजकारण बातम्या

धनंजय मुंडेंनंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारमधील राष्ट्रवादी अजित पवार गट नेत्यावरील आरोपांमुळे अडचणीत आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप होत असलेले धनंजय मुंडे यांनी कालच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यांनतर फसवणुकीप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देखील अडचणींत सापडले आहेत. आता यातच राष्ट्रवादी अजितदादाच्या आणखी एका बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा दिला.

ajit pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. वाशिमचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र आता त्यांनी वाशिमचे पालकमंत्री पद सोडल्याची बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूरशी संबधित आहेत. वाशिमचे पालकमंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी वक्तव्यही केल्याने चर्चेत होते. पण आता त्यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

---Advertisement---

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यावरून महायुतीतील पक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरू आहे. मात्र असे असतानाच हसन मुश्रीफांनी हा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

2 thoughts on “धनंजय मुंडेंनंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा”

Leave a Comment