जळगाव शहर

तूर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनीकिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । तुर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनिकिटकरीता जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव कार्यालयात १० जून, २०२१ पर्यंत कार्यालयाच्या [email protected] या ईमेलवर अर्ज करावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.  

अभियान संचालक तथा कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, पुणे यांचे निर्देशान्वये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन २०२१-२२ अंतर्गत खरीप हंगाम तूर पिकाच्या मिनिकिट वितरणाबाबत जिल्ह्यातील शेतकरी बांधव, आत्मा गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी व मागासवर्गीय/आदिवासी शेतकरी बांधव यांचेसाठी मिनीकिट पुरवठादार संस्था, नाफेडव्दारे तूर पिकाच्या राजेश्वरी या वाणाचा एकुण १४ क्विंटल (एकुण ३५० मिनिकिट, प्रती बॅग ४ किलो) पुरवठा जिल्ह्यातील एकाच ठिकाणी होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button