⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | शिवसेनेचे दोन दिग्गज नेते दोन दिवस जिल्ह्यात

शिवसेनेचे दोन दिग्गज नेते दोन दिवस जिल्ह्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२१ । शिवसेनेने जळगाव जिल्हा काबीज घेण्याचे ठाम निर्धार केला असून अनेक पक्षीय घडामोडी घडत आहे. नुकतेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि संजय सावंत हे दोन दिवस जिल्ह्यात येणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील आपले बळ मजबूत करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. जळगाव मनपा काबीज केल्यानंतर सेनेने तालुक्याच्या ठिकाणी मोर्चा वळवला आहे. जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सेनेने अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी सेनेचे प्रवक्ता संजय राऊत आणि जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे दि.११ आणि १२ रोजी जिल्ह्यात येणार आहे. दोन्ही नेते दि.११ रोजी चोपडा येथे बैठक घेऊन आढावा घेणार असून रात्री जळगाव शहरात मुक्कामी आहेत. दुसऱ्या दिवशी जळगावचा आढावा घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेत्यांचा दौरा जवळपास निश्चित झाला असून तशा सूचना देखील जिल्हा पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आल्या आहेत.

author avatar
Tushar Bhambare