जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा हात पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव व अमळनेर तालुक्यात रुग्ण संख्या वाढताना दिसून येत असल्याने या तिन्ही नगरपालिकांच्या हद्दीत निर्बंध लागू करण्यात आले आहे. दि. १३ मार्च पासून रात्री ते दिनांक १४ मार्चपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अनेक भागात रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. याकरिता आधीच जळगाव शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. आता जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव व अमळनेर इत्यादी नगरपालिकांच्या हद्दीत १३ मार्च ते १४ मार्च पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
काय सुरु काय बंद राहणार?
1) सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील.
2) किराणा दुकाने, Non-Essential इतर सर्व दुकाने बंद राहतील.
3) किरकोळ भाजीपाला / फळे खरेदी-विक्री केंद्रे बंद राहतील.
4) शैक्षणिक संस्था/शाळा/महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहतील.
5) हॉटेल / रेस्टॉरंट (होम डिलीव्हरी, पार्सल वगळता) बंद राहतील.
6) सभा/ मेळावे/बैठका / धार्मिक स्थळे, सांस्कृतिक/ धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. 7) शॉपींग मॉल्स / मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील.
8) गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्था, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.
9) पानटपरी, हातगाडयर, उघडयावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.
वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून दूध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक यांना सुट देण्यात आली आहे.