मानवाधिकार सहाय्यता संस्थाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी मोहम्मद शाहीन

जून 5, 2021 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । मानवाधिकार सहाय्यता संस्थाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी मोहम्मद अशिफ शाहीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही निवड मानवाधिकार सहाय्यता संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनू सिंह यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

mohammad shaikh

देशस्तरावर कार्यरत असलेल्या मानवाधिकार सहाय्यता संस्थातर्फे मानवी हक्कांचे हनन समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कार्य केले जाते. जळगाव जिल्ह्याची जबाबदारी मोहम्मद आशीफ शेख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

जिल्ह्यात मी पदाला न्याय देत सामाजिक कार्य गोरगरिबांचे विवाह कार्य आयोजित करणे, कौटुंबिक कलह सोडविणे, आरोग्य विषयक मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे मोहम्मद आशीफ शाहीन यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलतांना सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now