जळगाव शहर
अपर पोलीस अधीक्षकांनी केले वृक्षारोपण
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२१ । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी 50 लावून वृक्षारोपण केले.
पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस असून कोरोना काळात ऑक्सिजन व पर्यावरणाचे वाढते महत्त्व लक्षात घेता पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. जळगाव शहरात अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थान परिसरात ५० रोप लावून वृक्षारोपण केले. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज असून कोरोना काळात ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी झालेले हाल प्रत्येकाने पाहीले आहेत. आज प्रत्येकाने एक रोप लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.