---Advertisement---
जळगाव शहर

इंधन दरवाढीचा भडका ; जाणून घ्या आजचा जळगावातील पेट्रोल-डीझेलचा भाव

petrol diesel
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ ।  जळगावमध्ये सततच्या पेट्रोल दर वाढीने उच्चांक गाठला असून इतिहासात पहिल्यांदा पेट्रोलने १०० चा टप्पा पार केला आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ होत असून पेट्रोलचा दर १०२.१३ रुपये प्रति लिटर पर्यंत गेला आहे. तर डीझेल देखील ९० च्या पार गेले आहे. जळगावमध्ये  डिझेल ९२.६६ रुपये प्रति लिटर गेले आहे.

petrol diesel

आधीच कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असता त्यात सततच्या पेट्रोल-डीझेल दर वाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांदरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र 4 मे पासून इंधनाच्या दरात वाढ सुरु झाली. मे महिन्यात आतापर्यंत एकूण 16 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे सततच्या पेट्रोल दरवाढीने देशभरातील अनेक ठिकाणी १०० चा टप्पा ओलांडला आहे. जळगावातही पेट्रोल इतिहासात पहिल्यादाच १०० च्या वर गेले आहे. तर डीझेल ९० च्या वर गेले आहे.

---Advertisement---

देशभरातील मोठ्या शहरातील किंमती?

पेट्रोल:

आज शनिवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १००.९८ रुपयांवर कायम आहे. आज दिल्लीत पेट्रोल ९४.७६ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९६.२३ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९४.७६ रुपये झाला आहे. काल शुक्रवारी देशभरात पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल २८ पैशांनी महागले होते.

डीझेल

मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९२.९९ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८५.६६ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ९०.३८ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८८.५१ रुपये प्रती लीटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०२.८९ रुपये असून डिझेल ९४.१९ रुपये झाले आहे.

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---