जळगावातील हॉटेलमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय; पोलिसांच्या छापेमारीत ६ महिलांची सुटका, दोघे ताब्यात

जानेवारी 6, 2025 5:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जानेवारी २०२५ । मागील काही दिवसापासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील अवैध धंदे गाजत असून याच दरम्यान पोलिसांकडून कारवाई होतं असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता हॉटेलांमध्ये चोरीछुपे सुरु असलेला वेश्या व्यवसायही उद्धवस्त केला जात आहे. आज सोमवारी जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यात सहा महिलांची सुटका करण्यात आली तर दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

Sex racket jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी भागात जी सेक्टरमधील सागर लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार सोमवार दि.६ रोजी पथकाने लॉजवर छापा टाकत सहा महिलांसह २ जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now