जळगाव एमआयडीसीतील चटई कंपनीला भीषण आग

डिसेंबर 30, 2024 9:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास चटई कंपनीला अचानक आग लागली. रात्री दोन वाजेपर्यंतही आग आटोक्यात आली नव्हती. दरम्यान, कंपनीतील कुलरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे कामगारांनी सांगितले. सुदैवाने आगीत कुणीही जखमी झालेला नाही.

fire chatai company

आग विझवण्यासाठी जळगावसह भुसावळ, वरणगाव, दीपनगर, चाळीगाव अशा विविध ठिकाणचे आठ ते दहा अग्निशमन बंद मागवण्यात आले. एमआयडीसी परिसरात डी सेक्टरमध्ये सिद्धिविनायक इंडस्ट्रीज नावाची चटई कंपनी आहे. रविवारी रात्रीच्या तिसऱ्या शिफ्टसाठी कामावर आलेले दहा ते पंधरा कामगार आग लागल्यानंतर बाहेर निघाले. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले.

कंपनीत तयार चटई आणि प्लास्टिक दाणे कच्चा माल असल्याने आग लागलीच पसरली. काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे की कंपनीत एक गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला. या दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह कर्मचारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लक्ष ठेवून होते

या आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे आणि कंपनीच्या कार्यालयीन कागदपत्रे आणि संपूर्ण उत्पादन सुविधा नष्ट झाली आहेत. आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अधिकारी चौकशी सुरू ठेवणार आहेत. या घटनेमुळे कंपनी आणि त्यात काम करणार्या कर्मचार्यांवर मोठा परिणाम होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now