खबरदार! तर खाजगी वाहनांवर होणार कारवाई, काय आहे बातमी वाचा..

डिसेंबर 24, 2024 6:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीची वाहने वगळता खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहून व आतील भागात महाराष्ट्र शासन, नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

New Project 3

जर अशा प्रकारची वाहने ज्यावर महाराष्ट्र शासन नाव, लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागास स्टीकर चिकटवून वाहने रस्त्यावर फिरतांना आढळून आली तर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

खाजगी वाहनांवर किंवा वाहनांत महाराष्ट्र शासन अशा पाटी किंवा बोध चिन्हाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियन व त्याअंतर्गत नियमानुसार कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी सर्व वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now