डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसइ स्कूल सावदा येथे क्रिडा महोत्सव उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२४ । सावदा येथील उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसइ स्कूल मध्ये दरवर्षीप्रमाणे क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.
दिनांक १७ डिसेंबर रोजी उद्घाटन प्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव मा. डॉ. वर्षा पाटील सदस्य डॉ.अनिकेत पाटील, सावदा पो.स्टे चे स.पो.नि वैभव पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. भारती महाजन हे मान्यवर उपस्थित होते. प्रमुखा पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिज्ञासा भारंबे या गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला.मार्च पास करण्यात आले व ध्वजारोहणाला सलामी दिली गेली.
क्रीडा ध्वजारोहण शपथ विधिग्रहण तसेच मशाल प्रज्वलित करण्यात आली. विविध प्रकारच्या खेळांवर आधारित विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले . त्यानंतर स.पो.नि वैभव पाटील यांनी शाळा व विद्यार्थी यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त करतांना क्रिडा प्रकारच्या टीप्स दिल्यात तर डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करतांना क्रिडा प्रकारांमूळे शरीरास व्यायाम मिळतो तसेच त्यांना असलेल्या फुटबॉल खेळाची आवड आणि त्या करीता घेतलेले कष्ट विषद करीत विदयार्थ्यांचे कौतुक केले . या वेळी मोठया प्रमाणावर पालकवर्ग देखीले उपस्थित होता.
क्रीडा स्पर्धेची सुरुवात क्रिकेट मॅच ने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. महिला आणि पुरुष पालक देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी क्रिकेट मॅच, बुद्धिबळ, कबड्डी अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते हा महोत्सव १७ ते २० डिसें पर्यंत चालणार आहे.. याप्रसंगी सगळे शाळेचे विद्यार्थी शिक्षक , कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीचे विद्यार्थी_ विद्यार्थिनी प्राची राठोड ,आर्या पाटील ,रितेश सुरवाडे, संकेत जोशी यांनी केले.